नीरव मोदी विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

पंजाब नॅशल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी विरोधात आता थेट इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. त्यामुळे नीरव मोदीच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.

गेल्याच आठवड्य़ात सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती. पासपोर्ट रद्द होऊनही निरव मोदी जगभर कसा काय प्रवास करू शकतो असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

आता थेट इंटरपोलनंच नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानं त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. नीरव बरोबरच त्याचा निशाल मोदी आणि त्याच्या कंपनीचा अधिकारी सुभाष परब या दोघांविरोधातही इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live