Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार,या तारखेला होणार फाशी !

Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार,या  तारखेला  होणार फाशी !

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून फक्त 'तारीख पे तारीख' दिली जात असलेल्या निर्भया बलात्कार केस प्रकरणी आज (ता.५) दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. नवीन डेथ वॉरंट दाखल करण्यात आले असून या सर्व चारही दोषींना २० मार्चला सकाळी ५:३० वाजता फाशी दिली जाणार आहे, यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

कायद्यातील पळवाटांमुळे या केसचा निकाल वारंवार पुढे ढकलण्यात येत होता. मात्र, आता यावर अंतिम निर्णय झाला असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट होते. या प्रकरणातील दोषी अक्षय ठाकूर, पवनकुमार गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांना फाशी दिली जाणार आहे.

दरम्यान, निर्भया प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार होती. मात्र, दोषी पवनकुमारने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली. ती राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती. क्युरेटिव्ह याचिकेवरील निर्णय न झाल्याने पटियाला हाऊसने २ मार्चला फाशीची शिक्षा काही काळासाठी पुढे ढकलली होती. 

कोर्टाच्या या निर्णयाचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अखेर सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतर नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आले. यानुसार, येत्या २० मार्चला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकविण्यात येणार आहे. 

Nirbhaya Case: Delhi Court issues a fresh death warrant against the four convicts. They are to be hanged at 5.30 am on March 20, 2020 pic.twitter.com/MAOx5rVVGw

— ANI (@ANI) March 5, 2020


 

Web Title: marathi news nirbhaya case convicts fianlly to be hanged on this date !

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com