VIDEO | निर्मला सितारमण यांचं कांदा दरवाढीवर आश्चर्यकारक उत्तर

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कांद्याच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरूवात केलीय. आत संसदेतही हा मुद्दा गाजला. त्याला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चमत्कारीक उत्तर दिलंय. नेमकं काय उत्तर दिलंय सितारमण यांनी पाहुयात या स्पेशल विश्लेषणातून...

 

कांद्याच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरूवात केलीय. आत संसदेतही हा मुद्दा गाजला. त्याला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चमत्कारीक उत्तर दिलंय. नेमकं काय उत्तर दिलंय सितारमण यांनी पाहुयात या स्पेशल विश्लेषणातून...

 

आज लोकसभेत कांद्याचा मुद्दा चर्चेला आला आणि चर्चेतल्या खोचक टोलेबाजीमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या खास  तिरकस शैलीत लोकसभेत कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. 

सुप्रियाताईंच्या या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन बाईंनी हे अजब तर्कट मांडलंय. त्यांच्या या विधानावरून देशभरात संताप व्यक्त केला जातोय.
सोशल मीडियावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जातेय. काँग्रेसनेही 'कॅफे निर्मलाताई'च्या नावाने एक मेन्यू ट्विटरवर शेअर केलाय. या मेन्यूतील कांद्याच्या पदार्थांच्या नावातील कांदा आणि लसूण या शब्दांवर काट मारत सीतारामन यांच्यावर निशाणा साधलाय. 
राज्यासह देशात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडून बराच काळ लोटलाय. आता तर कांदा प्रतिकिलो २०० रुपयांच्या पार जाण्याची शक्यता असूनही केंद्राकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा आयात करूनही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर अद्यापही चढेच आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांकडून अशी उत्तरं मिळत असतील, तर येत्या काळात कांदा दरवाढीच्या मुद्द्याला राजकीय फोडणी दिली जाणार हे नक्की.

Web Title - Nirmala sitaraman gave shocking answer about onion 's high rates 


संबंधित बातम्या

Saam TV Live