मतदारांना स्वप्ने दाखवून ती पूर्ण केली नाहीत, तर या नेत्याला लोक मारतील - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

"सपने दिखाने वाले नेता लोगोंको अच्छे लगते हैं, पर दिखाये हुये सपने अगर पुरे नहीं किये तो जनता उनकी पिटाई भी करती है. इसलिए सपने वही दिखाओ जो पुरे हो सके. मैं सपने दिखाने वाले में से नहीं हूँ, मैं जो बोलता हूँ ओ 100 परसेंट पूरा करता हूँ.'' 

मुंबई -  मतदारांना स्वप्ने दाखवून ती पूर्ण केली नाहीत, तर या नेत्याला लोक मारतील, असे वक्‍तव्य करून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज खळबळ उडवून दिली. 

मुंबईच्या षण्मुखानंद सभाग्रहात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी गडकरी म्हणाले की, "सपने दिखाने वाले नेता लोगोंको अच्छे लगते हैं, पर दिखाये हुये सपने अगर पुरे नहीं किये तो जनता उनकी पिटाई भी करती है. इसलिए सपने वही दिखाओ जो पुरे हो सके. मैं सपने दिखाने वाले में से नहीं हूँ, मैं जो बोलता हूँ ओ 100 परसेंट पूरा करता हूँ.'' 

नितीन गडकरी यांच्या या नव्या विधानामुळे उपस्थित नेते अवाक झाले. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष ऍड. आशिष शेलार उपस्थित होते. नितीन गडकरी थेट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वक्‍तव्याने राजकीय वर्तुळात अनेकदा खळबळ उडाली होती. लोकसभेच्या निवडणुका समोर आल्याने त्यांच्या विधानाचा विरोधकांकडून पद्धतशीरपणे वापर होण्याची शक्‍यता आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live