कार्यक्रमादरम्यान गडकरी स्टेजवरच कोसळलेत ; आता प्रकृती स्थिर.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली. अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात स्टेजवरच गडकरींना स्टेजवर भोवळ आली. यावेळी शेजारी असलेल्या राज्यपाल सी विद्यासागरराव यांनी गडकरींना तात्काळ सावरलं. त्यानंतर त्यांना खाली बसवण्यात आलं. 

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला नितीन गडकरी आले होते. त्यांचं भाषण संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झालं. त्याचवेळी त्यांना भोवळ आली. आणि ते तिथेच मंचावर कोसळले. यावेळी उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, तत्काळ नितीन गडकरी यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं. आता नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे. लो शुगर मुळे भोवळ आल्याचं गडकरी यांनी ट्विट वरून सांगितलंय. त्यानंतर गडकरी यांनी शिर्डीच्या साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष विमानाने नागपूरला रवाना झालेत.  

WebTitle : marathi news nitin gadkari collapsed on stage due to low sugar level 

संबंधित बातम्या

Saam TV Live