देशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून; 96 टक्के पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता. 15) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. यंदाचा माॅन्सून सर्वसाधारण स्वरूपाचा राहण्याच्या पूर्वानुमानामुळे दिलासादायक चित्र यंदा पाहण्यास मिळेल, अशा आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. 1951 ते 2000 कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी 89 सेंटिमीटर म्हणजेच 890 मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (39 टक्के), तर दुष्काळाची शक्यता कमी (17 टक्के) असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या 91 टक्के (उणे 9 टक्के) पाऊस पडला होता.

Web Title: marathi news Normal Monsoon in the country this year The probability of 96 percent rain

संबंधित बातम्या

Saam TV Live