मोदींवर टीका करण्याची ही वेळ नाही - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कोरोनाच्या संकटात राज्य आणि जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा उत्तम काम करीत आहे. त्यांना मदत केली पाहिजे. आणिबाणीची परिस्थिती आहे त्यामुळे हातात घालून सर्वच पक्षांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

कोरोनाचे देशावर संकट आहे आणि संकटात सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही असे स्पष्ट करतानाच पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला पैसे द्यावेत आणि गरीब माणसाच्या खात्यात कसे पैसे जमा होतील हे पाहिले पाहिजे.

कोरोनाच्या संकटात राज्य आणि जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा उत्तम काम करीत आहे. त्यांना मदत केली पाहिजे. आणिबाणीची परिस्थिती आहे त्यामुळे हातात घालून सर्वच पक्षांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

आपली गोदामे अन्नधान्याने भरली आहेत ती गरीबांसाठी खुली केली पाहिजे असे आवाहनही गांधी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मी नेहमीच कठोर टीका करतो पण, आजची वेळ टीकेची नाही. आज आम्ही भांडत बसलो तर संकटाचा सामना करण्याऐवजी पराभूत होऊ असा इशाराही त्यांनी दिला 

कोरोनाच्या पार्श्वभूमीव गांधी यांनी आज प्रथमच झुमद्वारे पत्रकारांशी संपर्क साधला. देशातील सद्य परिस्थितीबाबत त्यांनी चिंता केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत मी टीका करणार नाही असे प्रारंभीच स्पष्ट करून गांधी म्हणाले, "" पंतप्रधानांची लॉकडाऊन केले. या लॉकडाऊननंतर काही तयारी करणे गरजेचे होत्या पण, आता झाले ते झाले आजच्या परिस्थितीवर आपण असे म्हणून आज रूग्णांची तपासणीबाबतचा आहे. कोरोनाच्या रुग्गांची अधिक अधिक तपासणी होणे गरजे आहे. 

कोरोनोच्या संकट संपले की मोठ्या संकटांना देशाला सामोरे जावे लागणार आहे. भारत देश इतर देशांच्या तुलनेत खूप मोठा आहे. लढाई आता संपली आहे. ही लांबची लढाई आहे आणि हळूहळू लढावे लागणार आहे. आपल्याकडे रोजगाराची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे. सरकारला मला काही सूचना करायच्या आहे. 

आपल्याकडे अन्नधान्याची गोदामे भरली आहेत. लोकांनी अन्नधान्य मिळाले पाहिजे. कारण लॉकडाऊनमध्ये गरीबांचे सर्वाधिक हाल होताना दिसत आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही मदत ही मिळालीच पाहिजे.कोरोनाच्या संकटात राज्यांना जीएसटीची पैसे दिले पाहिजे असे मला वाटते. हॉटस्पॉट भागात टेस्टींग करायला हवे. भारताने टेस्टींग करण्यावर भर देण्याची गरज असून स्ट्रॅटेजिकली विचार केला पाहिजे.  


संबंधित बातम्या

Saam TV Live