वेदनादायी कॅन्सर आता होणार कायमचा हद्दपार.

वेदनादायी कॅन्सर आता होणार कायमचा हद्दपार.

कॅन्सरचं नाव काढलं तरी पेशंट अर्धमेला होतो. त्यात कॅन्सरवरचे केमोथेरपीचे उपचार म्हणजे रोग परवडला पण उपचार नको, अशी स्थिती..मात्र, आता नव्या तंत्रामुळे कॅन्सरचा समूळ नायनाट करणं शक्य होणाराय. आणि हे उपचारही वेदनादायी नसतील. 

कॅन्सरवरचे उपचार यापुढे कोणत्याही वेदनेशिवाय होतील. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे कॅन्सर पेशंट केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे होणाऱ्या वेदनांशिवाय खडखडीत बरा होईल. आणि हा आजार पुन्हा उलटणार नाही.  अमेरिकेत अशा उपचारांसाठी 3 ते 4 कोटी खर्च येतो. मात्र येत्या काही दिवसांत भारतात अवघ्या 15 लाख रुपयांत हे उपचार होऊ शकतात.

जीन थेरपी आणि सेल थेरपीच्या मदतीनं रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवून कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचं हे तंत्रज्ञान आहे. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स आणि बायोइंजिनीयरिंगच्या प्रा. राहुल पुरवार आणि त्यांच्या टीमनं या तंत्राच्या प्रयोगशाळेतल्या चाचण्या केल्या आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. गौरवर नरुला यांच्या मदतीनं लवकरच क्लिनिकल ट्रायल्सही सुरू करणार आहेत.

हे तंत्र काय आहे?
कॅन्सरच्या गाठी ओळखून त्या नष्ट करण्याचं काम पांढऱ्या पेशी किंवा टी-सेल्स करतात. मात्र, कॅन्सरनं पुढचा टप्पा गाठला की त्या गाठी ओळखता येत नाही. नव्या कार-टी सेल थेरपीत पांढऱ्या पेशींची कॅन्सर पेशींना ओळखण्याची क्षमता पुनर्स्थापित केली जाते. कार्स या प्रथिनांच्या माध्यमातून टी-सेल्स कॅन्सर पेशींना ओळखतात आणि ही प्रथिनं कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात. रुग्णाच्या शरीरातूनच काढलेल्या पेशींची संरचना बदलून त्या सक्षम केल्या जातात.

सध्या जगभर या उपचारपद्धतीच्या चाचण्या सुरू आहेत. सभारतातील अनेक खासगी संस्थाही ही उपचारपद्धती आपल्याकडे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे तंत्रज्ञान महागडं आहे..मात्र, ते स्वस्त करण्यासाठी या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. तसं झालं तर असंख्य पेशंट या तज्ज्ञांना दुवा देतील, हे नक्की.

Web Title - Now cancer's Treatment more easy 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com