आता कॉलेजसचीही सुरूवात 1 मार्चपासून राष्ट्रगीताने होणार...

आता कॉलेजसचीही सुरूवात 1 मार्चपासून राष्ट्रगीताने होणार...

मुंबई : येत्या 1 मार्चपासून राज्यातील महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यात बुधवारी (ता.19) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. याच शुभमुहूर्तावर राज्यसरकारने हा निर्णय घेतला. तरूण पिढीच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केले जाणार आहे. याची सुरूवात मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार आहे.

या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवसापासून सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. अधिसूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाज सुरू होईल. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. राज्यातील शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि शाळा सुटण्यापूर्वी देखील सामुहिक राष्ट्रगीताने होते. आता राज्य सरकारच्या नवीन अधिसूचनेनंतर महाविद्यालयांमध्ये देखील राष्ट्रगीताने सुरूवात होणार आहे.

Web Title - Now collages rutine starts by national anthem

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com