आपत्कालीन परिस्थितीसाठी मेल-एक्‍स्प्रेसमध्ये डॉक्‍टर; नाना पटोलेंचे आश्वासन

सरकारनामा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मुंबई  : आपत्कालीन परिस्थितीसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये डॉक्‍टर असावेत, म्हणून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरवठा करू, असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे डेक्कन क्वीनला भेट देऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) उपक्रमांचा आढावा घेतला.

मंगळवारी शताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये शिळे ब्रेड-बटर खाल्ल्यामुळे ३६ प्रवाशांना त्रास झाला. या घटनेची विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्‍टर असावेत. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळेल. या संर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीनवर लावण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या अशा उपक्रमांमुळे विदर्भातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्‍वास पटोले यांनी व्यक्त केला. देश आणि राज्यातील अन्य मेल-एक्‍स्प्रेसवरही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करावी, अशा सूचना त्यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना दिली. पर्यटनाचा विकास झाल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. पुढील काळात विदर्भात रोजगारनिर्मिती करणे, शेतकरी आत्महत्या रोखणे यासाठी पर्यटनाच्या विकासावर भर देण्यात येईल, असे पटोले यांनी सांगितले.

आणखी १० एक्‍स्प्रेसवर पर्यटनस्थळे

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीनवर लावण्यात आली आहेत. या उपक्रमाला पर्यटकांचा किती प्रतिसाद मिळतो, याची तीन महिने पाहणी केली जाईल. त्यानंतर वर्षभरात आणखी १० एक्‍स्प्रेसवर वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना प्रसिद्धी दिली जाईल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

Web Title - Now doctor in mail or express says nana patole

संबंधित बातम्या

Saam TV Live