तुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम

तुमच्या घरालाही मिळणार सातबारा ; स्वतःच्या घरावरचा अधिकार आता अधिक भक्कम

तुमच्या मालकीची सदनिका असेल तर तिच्यावरचा अधिकार सांगणारी कोणती कागदपत्रं तुमच्याकडे आहेत. कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा. मात्र, भविष्यात काही मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला तर? या वादात तुमचा मालकीहक्क कायम राहील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आता प्रत्येक सदनिकाधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावाला मान्यताही दिलीय. हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या सदनिकेचा सातबाराच असेल. या योजनेची सुरुवात पुण्यापासून  होणार आहे. 

भूकंप, पूर, आग अशा घटनांमध्ये सोसायटी नष्ट झाली तरी त्यातील प्रत्येक सदनिकाधारकाला आपल्या सदनिकेच्या हक्काचा पुरावा म्हणून या प्रॉपर्टी कार्डकडे पाहिलं जाईल. आतापर्यंत ज्या जमिनीवर इमारत आहे त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर त्या सोसायटीची नोंद असते. त्यावर सर्व सदस्यांची एकत्र नावं असतात. एखाद्या सदस्यानं कर्ज घेतलं तर त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर होते. मात्र, त्याचा त्रास अन्य सदस्यांना होऊ शकतो. मात्र, स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड आल्यानं हा त्रास टळेल.

  • या प्रॉपर्टी कार्डवर त्या सदनिकेच्या मालकाची पूर्ण माहिती असेल.
  • त्याआधीच्या मालकाचीही नोंद त्यावर राहील.
  • या सदनिकेचं क्षेत्रफळ, सदनिकेवर असलेलं कर्ज, अन्य कोणता बोजा असेल तर त्याची नोंद या प्रॉपर्टी कार्डवर होईल.
  • या प्रॉपर्टी कार्डमुळे सदनिकेची खरेदी-विक्री, कर्ज घेणं या प्रक्रिया अधिक सुलभ होतील.

सामान्य नागरिकांसाठी घर ही आयुष्यभराची मिळकत असते. त्यामुळे घराच्या मालकीवरून होणारा वाद त्याच्यासाठी कायमची डोकेदुखी असते. सरकारच्या निर्णयामुळे ही डोकेदुखी कायमची बंद होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

WebTitle : marathi news now maharashtra state government will give separate property card to all flat owners



 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com