आता दुध महागणार, राज्यात दुधाचा तुटवडा!

आता दुध महागणार, राज्यात दुधाचा तुटवडा!

देशात आधीच कांद्याच्या भाववाढीने नागरिक हैराण आहेत आणि त्यातच आता दुधही महागणार म्हटल्यावर चिंता वाढलीय. गेल्या 10 दिवसांपासून दुधाचा तुटवडा जाणवू लागलाय. 

राज्यात सरासरी 1.40 कोटी लिटर दुधाची गरज असताना सध्या दररोज 1.10 कोटी लिटर दुधाचेच संकलन होत आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत दूध खरेदीचे दर काहीसे वाढलेत. अहमदनगर येथे 29-30 रुपये प्रति लिटर तर कोल्हापूर, सांगली आणि पुण्यात 26 ते 28 रुपये प्रति लिटर दुधाचे दर आहेत. 

पावसाळ्यानंतर दुधासाठी अनुकूल हंगाम  सुरू होत असतो, तरीही यंदा तुटवडा जाणवत असल्याने अधिकच समस्या उद्भवतील. हिरवा चारा आणि मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने पावसाळा संपताच दुधाचे उत्पादन वाढत असते. हा दुधाच्या उत्पादनासाठी सुगीचा मानण्यात येतो. मात्र या वर्षी काही भागांत दुष्काळ,  तर काही भागांत महापूर यामुळे दुधाचा हंगाम खर्‍या अर्थाने अद्यापही सुरू झालेला नसून जानेवारीत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चार्‍याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दुग्धोत्पादकांनी दुभती किंवा गर्भार जनावरे खरेदीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, तुटवडा वाढत आहे.

महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 9 हजार जनावरे मेली. त्यात भर म्हणजे जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेला नसल्याचे क्षीरसागर म्हणाले. अहमदनगर, नाशिक, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे दुधाचे उत्पन्न घटले आहे. यंदाच्या हंगामात मुबलक दूध उपलब्ध होणे दुरापास्त असल्याचे मत ‘प्रभात’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मित्रा यांनी व्यक्‍त केले आहे. 

दरम्यान,  येत्या काळात दुधाच्या दरात दरवाढ अटळ असल्याचा इशारा राज्य दूध संघांनी दिला असून सरकारने प्रमाणित दुधाची पावडर आयात करण्याची गरज निर्माण होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या भाज्यांचे दरही कडाडले आहेत. आणि कांदा तर दिडशेच्या पार गेलाय. त्यामुळे सर्वसामान्यांनी खायचं तरी काय असा मोठा प्रश्न आहे. आता ही समस्या वाढते की कमी होते ते येणारा काळच सांगेल.

Web Title -   Now milk will be expensive.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com