आता रात्री-अपरात्री महिलांना पोेलिस पोहचवणार घरपोच!

मोहिनी सोनार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नागपूर : सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. आज प्रत्येक मह्ला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेयय त्यामुळे तिला सर्वांच्या बरोबरीने काम करणं भाग आहे. मग तिच्या सुरक्षेचा विचार कुठेच होतोना दिसत नाही. आज अनेक मिला रात्रपाळी करतात. किंवा अनेकांना रात्री घरी परतावे लागते. अशा वेळी त्यांच्यावर अतिप्रसंग बेतू शकतो. अशा वेळी प्रशासन, पोलिस कोणाही काही करु शकत नाही. त्यासाठी प्रशासन काहीसं जागं झाल्याचं दिसतंय. महिलांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय प्रशासनानं घेतलाय. 

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी एक खास निर्णय घोतलाय. तो म्हणजे रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल, तर त्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षातील 100  किंवा 07122561222 यावर डायल केल्यास पोलीस तिच्या मदतीला धावून येतील. आणि तिला सुखरुप घरी पोहचवतील. हा निर्णय खरोखर कौतुकास्पद आहे. देशात सर्व ठिकाणी हा नियम असायला हवा. 

अडचणीत असलेल्या महिलेने 100 नंबर डायल केल्यास कंट्रोल रुममध्ये तैनात ड्युटी अधिकारी, कर्मचारी, ती महिला उपस्थित असलेली जागा आणि संपर्क नंबर ट्रेस करतील. त्यानंतर नियंत्रण कक्षातून ती महिला कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, ते लक्षात घेऊन त्या ठाण्यात संपर्क करून माहिती देतील. त्या ठाण्यातील दोन महिला कर्मचारी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून मदत करेल. त्या महिलेला घरी पोहचवून दिल्यानंतर कंट्रोल रुमला रिपोर्ट सुद्धा देईल. यासंदर्भात  नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच पोलीस स्टेशनला तसे निर्देश दिले आहे. सोबतच ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीत असलेल्या महिलेला सुखरुप घरी पोहचवून देण्याची ताकीदही दिली आहे. पोलीस आयुक्तांचे पत्र पोहचल्यानंतर बहुतांश ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीही केली आहे.

सोशल मीडियावर चुकीचा नंबर  व्हायरल 

हैदराबादमधील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर महिलांच्या मदतीसाठी काही मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन केलं जातंय. मदत मागणायाच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून संबंधित वाहनावर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येत असल्याचा दावा केला जातोय. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा मोबाईल नंबरवर संपर्क केला असता, कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अडचणीत असलेल्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षातच संपर्क करावा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात
राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Now police will be leave women at her home overnight!

संबंधित बातम्या

Saam TV Live