चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या वर...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 एप्रिल 2020

सध्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 8988 लोकांवर उपचार सुरू असून, एक हजार छत्तीस जणांवर यशस्वी उपचार करुन, त्यांना घरी सोडण्यात आलंय़.

देशातील कोरोनाग्रस्तांनी दहा हजाराचा आकडा पार केलाय. देशात आतापर्यंत 10,463 जणांना कोरोनाची लागण झाली असून. तिनशे एकोणसत्तर जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सर्वाधिक मृत्यूंमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडूमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. 
सध्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 8988 लोकांवर उपचार सुरू असून, एक हजार छत्तीस जणांवर यशस्वी उपचार करुन, त्यांना घरी सोडण्यात आलंय़.. 

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वात जास्त

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 1985 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, 149 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 217 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, संस्कृतिक राजधानी वाराणसी व पुणे आणि सर्वात स्वच्छ शहराचा मान सातत्याने मिळवणाऱ्या इंदोरसह देशाच्या आठ राज्यांमधील किमान ३५ ठिकाणं कोरोना महासाथीचा हॉटस्पॉट बनली आहेत.  

 

काही भाग पूर्ण सील

हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमधील एका मागोमाग एक भाग हे पूर्णतः सील करण्याचे धोरण यंत्रणेला अमलात आणावे लागत आहे. सील कराव्या लागणाऱ्या भागांमध्ये वाढ होणार नाही, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live