मुंबईसह राज्यात असह्य उकाडा; पाऊस परतीला, पारा चढतीला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

ऑक्टोबर महिन्यात राज्यातल्या जनतेच्या अंगाची वैशाख वणव्यासारखी लाहीलाही होतेय. परतीच्या मार्गाला लागलेल्या पावसामुळं राज्यातल्या प्रमुख शहरांचा पारा पस्तीशीच्या पुढं गेलाय. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागते. दुपारी तर घराबाहेर पडण्याची हिंमतही होत नाही. ऑक्टोबर हिट असली तरी यंदाचा उकाडा जास्तच असल्याचं सांगण्यात येतंय.

उकाड्याचे हे दिवस काही काळच राहतील असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. पण ऑक्टोबर हिट येणाऱ्या थंडीआधी उकाड्याचा ट्रेलर घेऊन आलीय असं म्हणायला हरकत नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live