नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी आलेल्या तरुणीला दाखवली पॉर्न क्लीप 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

युवतीला मुलाखतीदरम्यान पॉर्न क्लिप दाखविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 21 वर्षीय युवती नोकरीसाठी एका कंपनीकडे गेली होती. अर्जाचे शुल्क म्हणून तिच्याकडून शंभर रुपये घेण्यात आले व दुसऱया दिवशी मुलाखतीसाठी बोलविले. एमपी नगर झोन 1 मध्ये असलेल्या कार्यालयामध्ये मुलाखती गेलेल्या युवतीला कंपनीचा संचालक रुद्र प्रताप सिंग याने समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले व काम्प्युटरवर पॉर्न क्लिप सुरू केली.

युवतीने यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याने क्लिप बंद केली. मात्र, तुला जर नोकरी हवी असेल तर काहीतरी तडजोड करावी लागेल. यानंतर तत्काळ घरी परतलेल्या युवतीने याबाबतची माहिती घराजवळ राहणाऱया मित्रांना दिली. यानंतर एमपी नगरच्या पोलिस चौकीमध्ये येऊन तक्रार दाखल करण्यात आली.

युवतीने दिलेल्या तक्रारीवरून रुद्र प्रताप सिंग याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव मनोज चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले. खोट्या नावाची व्हिजिटींग कार्ड तयार करून तो वावरत होता. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live