स्थानक दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने पुणे- कोल्हापूरदरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द

 स्थानक दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने पुणे- कोल्हापूरदरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द

ओगलेवाडी - पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील शेणोली-भवानीनगर-ताकारी स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ३० जूनअखेर पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, सातारा- कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा या दररोज धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. 

या गाड्या रद्द झाल्याने प्रवशांना आर्थिक फटकाही बसत आहे. या पॅसेंजर गाडीने मिरज, सांगलीकडे दररोज प्रवास करणारे तसेच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. किर्लोस्करवाडी येथे नोकरीनिमित्त ये-जा करणारे प्रवासी जास्त आहेत. पॅसेंजर गाड्या तात्पुरत्या बंद केल्याने कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर शुकशुकाट जाणवत आहे. दूरवर जाणारे प्रवासी एक्‍स्प्रेस गाड्यांची ताटकळत वाट पाहत असतात. मिरज-पुणे लोहमार्गावर ३३ रेल्वे स्थानके आहेत.

या मार्गावरील कऱ्हाड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, तेथून दररोज राज्यात व परराज्यात सुमारे ४० प्रवासी गाड्या धावतात. सामान्य प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांच्या अभावी जादा भाड्याच्या एक्‍स्प्रेस गाड्यांनी नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. लहान स्थानकावर एक्‍स्प्रेस गाड्यांचा थांबा नसल्याने पर्यायाने प्रवाशांना एसटीने अथवा जीपने प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गाडीतील फिरत्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच स्थानकावरील रिक्षा व्यवसायावरही आर्थिक परिणाम झाला आहे.

Web Title: Pune Kolhapur Passenger Railway Cancel

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com