मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ; अनेक राज्यांमध्ये खातंही न उघडण्याची काँग्रेसवर नामुष्की

मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ; अनेक राज्यांमध्ये खातंही न उघडण्याची काँग्रेसवर नामुष्की

2014 प्रमाणे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेनं काँग्रेसला जबर दणका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती. ही घोषणा यावेळी जवळपास 14 राज्यांमध्ये खरी ठरताना दिसते आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसला भोपळादेखील फोडता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत गुजरात आणि राजस्थानध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केली होती. राजस्थानमध्ये तर विधानसभेत काँग्रेसनं सत्ताही मिळवली. मात्र,  विधानसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत करता आलेली नाही. राजस्थानातील सर्वच्या सर्व 25 मतदारसंघात काँग्रेसची धूळधाण होताना दिसत आहे. यातील 24 जागांवर भाजप तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.

पंतप्रधान मोदींच्या होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. गुजरातमधील 26 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. 2014 मधील विजयाची भाजपानं पुनरावृत्ती केली. भाजपा दिल्लीतील सातही मतदारसंघात पुढे आहे. दिल्लीतही काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि आप आघाडी करणार अशी चर्चा होती. मात्र या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवली. त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला आहे.

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर वायएसआर काँग्रेस, तर एका जागेवर टीडीपी पुढे आहे. ओडिशातील एकूण 21 जागांपैकी 14 जागांवर सत्ताधारी बिजू जनता दल, तर 7 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. ओडिशात काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश,अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड,मणीपूर,मिझोराम,सिक्कीम,त्रिपुरा या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही.

भाजपच्या या झंझावात काँग्रेसचा जबर दणका बसलाय. अनेक राज्यांमध्ये खातंही न उघडण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावलीय. आता या राज्यात पक्ष संघटनेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेतृत्वासमोर असणार आहे. 

WebTitle : marathi news once again modi wave in india congress couldn't open their account in many states 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com