ओला-उबर पुन्हा संपावर जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक  पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे. दिवाळीपूर्वी ओला आणि उबेर टॅक्सी सेवेच्या चालक आणि मालक  सलग १२ दिवस संपावर गेले होते. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आला होता. मात्र रावते यांच्याशी झालेली चर्चेचा देखील फायदा न झाल्याचे दिसत असून येत्या शनिवारपासून ओला-उबेर कंपन्यांनी पुन्हा संपाची घोषणा केली आहे. 

गेल्यावेळेस ओला – उबर चालक - मालकांना चांगला दर देण्यासाठी प्रवासी भाडेवाढ करण्यात यावी, असा एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यास मंत्री रावते यांनी पूर्णत: असहमती दर्शवली होती. 'सरकारी पातळीवरील चर्चा निष्फळ ठरत असल्याने आम्ही पुन्हा संपवार जाण्याचा निर्णय घेत असल्याचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  

संबंधित बातम्या

Saam TV Live