VIDEO | अबब, साडेसोळा लाखांचा बैल !

संदीप चव्हाण
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

एका शेतकऱ्याने फक्त शर्यतीसाठी बैल खरेदी केलाय...या बैलाची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल...आलिशान कारपेक्षाही महाग असणाऱ्या या बैलाची नेमकी किंमत आहे तरी किती? हौसेला मोल नाही असं म्हणतात...याचंच उदाहरण मावळमध्ये पाहायला मिळालंय...हा बैल बघा...शर्यतीच्या या बैलासाठी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजलेयत...किती, साडेसोळा लाख रुपये..

एका शेतकऱ्याने फक्त शर्यतीसाठी बैल खरेदी केलाय...या बैलाची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल...आलिशान कारपेक्षाही महाग असणाऱ्या या बैलाची नेमकी किंमत आहे तरी किती? हौसेला मोल नाही असं म्हणतात...याचंच उदाहरण मावळमध्ये पाहायला मिळालंय...हा बैल बघा...शर्यतीच्या या बैलासाठी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजलेयत...किती, साडेसोळा लाख रुपये.. या बैलाची एवढी किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल...पण, होय टोकदार शिंगं, काटक शरीरयष्टी असं वैशिष्ट्ये असलेला हा बैल घेण्यासाठी एवढे पैसे या शेतकऱ्यानं मोजलेयत...मावळमधील नवलाख उंबरे गावातील शेतकरी पंडित जाधव यांनी काही दिवसांपूर्वी हा बैल खरेदी केलाय...काही सेकंदात शर्यतीचा घाट सर करताना जाधव यांनी या बैलाला पाहिलं तेव्हाच ते या बैलाच्या प्रेमात पडले...आणि कोणतीही किंमत देऊन तो खरेदी करण्याचं त्यांनी ठरवलं तुम्हीच पाहा..

 

marathi news :  one and a half million bulls!

संबंधित बातम्या

Saam TV Live