एकीकडे कोरोनाशी सामना, दुसरीकडे पाकिस्तानी कोरोनाग्रस्तांना भारतात घुसवण्याचा डाव

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना पाकिस्तानने नापाक धंदे सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. 

एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना पाकिस्तानने नापाक धंदे सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. भारतात घुसखोरी करणं ही पाकिस्तानची जुनीच खोड आहे, मात्र यावेळी पाकिस्ताननं कोरोनाच्या पदराआड लपत घुसखोरीचं षडयंत्र रचलंय. कुरापतखोर पाकिस्तानने यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना भारतात घुसवण्याचा डाव रचलाय.

 बिहारच्या पश्चिम चंपारण या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बिहार सीमेकडून भारतात कोरोना संक्रमितांना घुसवण्याचा कट असल्याचं जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी म्हटलंय.

पोलीस अधीक्षक आणि सशस्त्र सीमा दलाच्या ४७च्या बटालीयनला कुंदन कुमार यांनी हे पत्र लिहिलंय. करोनाचा संसर्ग झालेल्यांना सीमेपलिकडून भारतात घुसखोरी करून दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात ४० ते ५० जणांचा समावेश आहे. करोनाचा संसर्ग फैलावण्याचा त्यांचा कट आहे, कुंदन कुमार यांनी पत्रात म्हटलं आहे.

या कोरोना संक्रमित रुग्णांना भारतात दाखल करण्यासाठी जालीम नावाच्या एका म्होरक्याची मदत घेतली जाणार आहे. जालीम हा शस्त्रास्त्रांची तस्करी करतो. तो नेपाळच्या पारसा जिल्ह्यातील जग्रनाथपूर गावात राहतो, नेपाळ सीमेतून करोनाचा संसर्ग झालेल्यांना भारतात दाखल करण्याचा जालीम याचा कट असल्याचं कुंदन कुमार यांनी पत्रात लिहिलंय. सशस्त्र सीमा दलाने सीमेवर गस्त वाढवावी अशी मागणीही त्यांनी केलीय. - 

एकीकडे देश कोरोनाशी झुंजतोय, पण त्याचवेळा कोरोना संक्रमित रुग्ण देशात घुसवून कोरोनाचा उद्रेक घडवून आणायचा नापाक डाव शिजतोय. या नापाक इराद्यांना तात्काळ ठेचायलाच हवं, नाहीतर हाहाकार माजायला वेळ लागणार नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live