पुलवामात पुन्हा हल्ला; मेजरसह चार जवान शहीद

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

जम्मू : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यात मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. तर, या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.

जम्मू : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यात मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. तर, या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात रविवारी मध्यरात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. पिंलगान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम राबविली असता दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. तर, एका नागरिकाचाही म़ृत्यू झाला आहे. सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घेरले असून, अद्याप चकमक सुरु आहे. एक जवान जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे. हुतात्मा झालेले जवान हे 55 राष्ट्रीय रायफल्सचे आहेत. हल्ला करणारे दहशतवादी जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे असल्याची शक्यता आहे.

पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती स्फोटात सीआरपीएफचे 44 जवान हुतात्मा झाले होते. घटनेला अवघे काही दिवस होत नाही तोच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्करावर हल्ला केला आहे. यामुळे देशभरात संतापाची लाट आहे.

WebTitle : marathi news one more cowardly terror attack in pulwama killed four jawans and a civilian 


संबंधित बातम्या

Saam TV Live