राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

शिवसेनेचा आणखी एक शिलेदार राजकारणात दमदार एंट्री घेण्यास सज्ज झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेट निवडणुकीत, युवासेना नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, अभाविपला धुळ चारली आणि शिवसेनेने गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. तसंच आदित्य ठाकरेंचं अभिनंदन करणारी जाहिरात सामना मधून छापण्यात आलीय. जाहिरातीचं वैशिष्ट म्हणजे या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राच्या खाली तेजस ठाकरेंचं छायाचित्र लावण्यात आलंय. त्यामुळे आणखी एक ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live