11 राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसह होणार विधानसभा?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

देशात आगामी लोकसभा निवडणुकांसह 11 राज्यांच्या विधानसभा निवडणूक होण्याच्या शक्यता आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर किंवा सहा महिने नंतर ज्या विधानसभांचा कार्यकाळ संपत आहे, त्या राज्यात निवडणुका एकत्र होऊ शकतात.

‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या समर्थनार्थ विधी आयोगाला एक पत्र लिहिले आहे.

प्रत्येकवर्षी होणाऱ्या विविध राज्यांतील निवडणूक कार्यक्रमांमुळे देश कायमच निवडणूक मोडवर असतो. यासाठी देशातील सार्वजनिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, हा खर्च टाळण्यासाठीच एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याला भाजपाचा पाठींबा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

WebTitle : marathi news one nation one election politics amit shah

संबंधित बातम्या

Saam TV Live