अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

अकोला : राज्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव राज्यातील विविध भागातील नागरिकांना येत आहे. असे असताना अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला.

राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात होणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्याची मोहीम 15 मार्चपासून हाती घेतली. दरवर्षी राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील नागपूर, अकोला, औरंगाबाद, तसेच नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळतात. उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी औरंगाबाद शहरातील व्यक्तीचा गेला. तर आता उष्माघाताने अकोल्यातील एकाचा मृत्यू झाला. 

शेषराव नामदेव जवरे असे त्या उष्माघातात बळी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात या युवकाचा मृतदेह आढळून आला असून, या प्रकरणी रामदास पेठ पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला हे शहर देशात उष्णतेत प्रथम आहे. या तरुणाचा मृत्यू उष्मघाताने झाला आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Marathi News One Person Died in Akola due to Sun Stroke

संबंधित बातम्या

Saam TV Live