विरारमध्ये माथेफिरूला मायलेकींनी दिला चोप... (व्हिडिओ व्हायरल)

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

नालासोपारा : घरात एकटी महिला झोपली असताना काही कारण नसताना घरात घुसलेल्या एका माथेफिरुला विरारमध्ये मायलेकींनी चांगलाच धडा शिकवला आहे.

नालासोपारा : घरात एकटी महिला झोपली असताना काही कारण नसताना घरात घुसलेल्या एका माथेफिरुला विरारमध्ये मायलेकींनी चांगलाच धडा शिकवला आहे.

विरार पूर्व या परिसरात शनिवारी (ता. 20) दुपारी चार वाजता ही घटना घडली. कमलेश नावाचा माथेफिरु चाळीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून घराचे दारे खिडक्या बंद करुन तिच्या जवळ बसला होता. सदर महिलेला हलचालीवरुन कळताच तिने उठून त्याला जाब विचारला तर तो त्याने माफी मागून पळ काढला. 

सदर महिलेची मुलगी कामावरुन घरी आल्यानंतर संतापलेल्या दोघी मायलेकींनी कुणाच्याही मदतीची वाट न पाहता त्याला गाठून त्याच परिसरात काठीने बेदम मारहाण करीत धडा शिकविला.

Web Title: one psycho enters in home when lady is alone


संबंधित बातम्या

Saam TV Live