लाँचीग आधीच OnePlus 6Tची किंमत लीक 

मोहिनी सोनार
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

येत्या 30 ऑक्टोबरला दिल्लीत एका शानदार सोहळ्यात बहूप्रतीक्षित OnePlus 6T हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. 30 ऑक्टोबरला रात्री 8:30 वाजता हा शानदार सोहळा पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा फोन होणार अश्या चर्चा होत्याच, आता त्यावर शिक्कामोर्तब झालाय.    

OnePlus 6T हा OnePlus 6 चा अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. दरम्यान, या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स लीक झालेत. लीक झालेल्या फीचर्सबद्दल कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिलाय. भारतात या फोनची विक्री 2 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.  ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनच्या बेस व्हेरीएंटची किंमत 37,999 रुपये इतकी असणार आहे. OnePlus 6 च्या नव्या फोनची किंमत तीन हजाराने जास्त आहे.

OnePlus 6T च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सामील होणाऱ्या लोकांना इव्हेंटमध्ये बनवण्यात आलेल्या खास झोनमध्ये या फोनला हाताळण्याची आणि त्याचे फीचर्स ट्राय करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन तुम्ही 2 नोव्हेंबरपासून ऍमेझॉन इंडियावर खरेदी करू शकता. 

ऑनलाईन  लीक झालेल्या रिपोर्ट्स नुसार OnePlus 6T च्या वेगवेगळ्या व्हेरिएंटसच्या किंमती
- 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 37,999 रुपये असू शकते. 
- 8GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 40,999 रुपये असू शकते 
- 8GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत  44,999 रुपये असू शकते 

संबंधित बातम्या

Saam TV Live