कांदा निर्यातीचा प्रश्न पेटला! शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद पवार दिल्लीत...

साम टीव्ही
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेले शेतकरी आणि व्यापारी यांच्या मदतीसाठी शरद पवार पुढे सरसावलेत. शरद पवार यांनी आज दिल्लीत केंद्रिय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.

कांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू केलीय. वाणिज्य मंत्रालयाने त्याबाबतचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे 3 हजार रुपयांच्या वर गेलेले कांद्याचे भाव गडगडलेत. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादकांनी दिलाय.

पाहा व्हिडिओ -

तर सर्वसामान्य आणि गरिबांच्या ताटातला बटाटाही गायब होण्याची शक्यता आहे. आवाक घटल्यानं किरकोळ बाजारात बटाट्याचे दर दुप्पट झालेत. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील किरकोळ बाजारात बटाटय़ाचे दर 50 ते 55 रुपयांपर्यंत पोहोचलेत.

 इकडे डाळींचाही तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यंदा खरीप पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यताय.

देशाला डाळींचा पुरवठा करणारी मुख्य बाजारपेठ ही अकोला, नागपूर आणि मुंबईतय. यंदा मात्र जेमतेम लागवडीमुळे तुटवड्याची शक्यता व्यक्त होतेय.

कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेले शेतकरी आणि व्यापारी यांच्या मदतीसाठी शरद पवार पुढे सरसावलेत. शरद पवार यांनी आज दिल्लीत केंद्रिय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.

 यावेळी त्यांच्यासोबत भाजप खासदार आणि माजी मंत्री सुभाष भामरे, दिंडोरीच्या भाजप खासदार भारती पवारदेखील उपस्थित होत्या. यावेळी पीयूष गोयलांना निवेदन देखील देण्यात आलं. कांदा निर्यातबंदीवरुन शरद पवार-पीयूष गोयल यांच्यात झालेल्या चर्चेमुळे काही तोडगा निघतो का याकडेच सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live