कांदा दरात घसरण; कांदा उत्पादक संतप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत. येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न समितीच्या बाहेर कांदा ओतून आंदोलन केलं, आणि सरकारचा निषेध केला.

यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एका शेतकऱयानं  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर ट्रॅक्टरमधून आणलेला संपूर्ण कांदा ओतला. हा कांदा त्यानं बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता.

मात्र कांद्याला 182 रुपये भाव मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने ट्रॅकटर मधील कांदा मार्केटच्या गेट समोर ओतून सरकार बद्दल रोष व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live