कांदा लवकरच ‘शंभरी’ गाठणार'; पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका

कांदा लवकरच ‘शंभरी’ गाठणार'; पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका

तुमच्या आमच्या जेवणातील प्रमुख घटक असलेला कांदा रडवण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा फटका कांदा पिकाला बसलाय. परिणामी बाजारात काद्यांची आवक घटलीय. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा मार्केटमध्ये सरासरी १०० ट्रक कांद्याची आवक होतेय. सध्या किरकोळ स्वरूपात 45 ते 50 रुपये किलो कांदा विकला जातोय. मात्र आवक घटल्यामुळं येत्या काही दिवसांत शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळं शेतातला कांदा सडलाय़. बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या कांद्यामध्ये जेमतेम 20 टक्केच कांदा चांगला आहे. कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशातील कांदा विक्रीसाठी येणं बंद झालंय...पावसामुळं कांदा लागवडीला महिनाभर उशिर झाल्यानं नवीन कांदा बाजारात डिसेंबर महिन्यामध्ये विक्रीला येण्याची शक्यता आहे.

एकीकडे वरुण राजाने रौद्र रूप धारण केल्यामुळे बळीराजाच्या डोळय़ात अश्रू आणले असताना दुसरीकडे महिन्याभरात कांद्याने शंभरी गाठली, तर गृहिणींच्या डोळय़ातही अश्रू तरळणार आहेत.विधानसभा निवडणुकीत कांदा मतदारांसह उमेदवारांचाही ‘वांदा’ करण्याची शक्यता आहे

WebTitle : marathi news onion rates to increase might touch 100 rs per kg 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com