VIDEO | ठाकरे सरकारला कांदा असा रडवणार?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कांद्याचे दर सध्या गगनाला भिडलेत. तब्बल 150 रुपये प्रतिकिलो झालेला कांदा ठाकरे सरकारला रडवणार असल्याची चिन्हं दिसतायंत. पाहुयात याबाबतचे सविस्तर विश्लेषण...

 

कांद्याचे दर सध्या गगनाला भिडलेत. तब्बल 150 रुपये प्रतिकिलो झालेला कांदा ठाकरे सरकारला रडवणार असल्याची चिन्हं दिसतायंत. पाहुयात याबाबतचे सविस्तर विश्लेषण...

 

महिन्याभरापासून कांद्याचे भाव चढे आहेत. मात्र आठवड्याभरात कांद्याचे दर गगनाला भिडलेत. कांदा प्रतिकिलो 150 रुपयांवर पोहचलाय. सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक १५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. राज्यभरात १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असे कांद्याचे दर आहेत. आता हेच दर ठाकरे सरकारला रडवण्याची चिन्हं आहेत. कांद्याच्या गगनाला भिडणाऱ्या दरांना रोखायचं कसं असा आळा ठाकरे सरकारसमोर आहे.

लांबलेला पावसाळा आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे यंदा शेतीला मोठा फटका बसलाय. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचं झालंय. कांद्याचं सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक, जळगाव पट्ट्यात कांद्याचं जवळपास सगळं पीक भिजून वाया गेलंय. पावसाळा ओसरल्यानंतरही चक्रीवादळ आल्याने काढलेला कांदा भिजला. यामुळेच कांद्याचे दर वधारू लागले आहेत.

ठाकरे सरकार राज्यात नुकतंच स्थिरावतंय. मात्र गगनाला भिडलेल्या कांद्याच्या दरांमुळं नवं आव्हान ठाकरे सरकारसमोर उभं ठाकलंय. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालताना ग्राहकांचा रोष ओढवू नये याची दक्षता आता ठाकरे सरकारला घ्यावी लागणार आहे.

 

Web Title - Onion's Rates will be incresed Too high in thakare goernment...


संबंधित बातम्या

Saam TV Live