ऑनलाईन पिझ्झा पडला 50 हजारांना, ज्येष्ठ नागरिकाला 50 हजारांचा गंडा

साम टीव्ही
बुधवार, 23 डिसेंबर 2020
  • ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात 
  • ज्येष्ठ नागरिकाला 50 हजारांचा गंडा
  • ज्येष्ठांच्या अज्ञानाचा फायदा घेत भामट्यांचा डल्ला

सध्याचा जमाना ऑलनाईन शॉपिंगचा आहे. अगदी किचनमध्ये लागणाऱ्या बारीकसारीक वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सारं काही ऑनलाईन मागवण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र त्याबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. नवी मुंबईतल्या अशाच एका ज्येष्ठ नागरिकाराला ऑनलाईन पिझ्झा चक्क 50 हजारांना पडलाय. 

हल्ली पिझ्झा, बर्गर किंवा खाण्याचे कोणतेही पदार्थ घरपोच मागवायचे असतील तर फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून सगळ्या वस्तू अगदी घरपोच मिळू लागल्या आहेत. पण नवी मुंबईतल्या या आजोबांना पिझ्झा मागवणं चांगलंच महागात पडलंय. नेरूळ सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या विष्णू आणि रोमी श्रीवास्तव या दाम्पत्यानं ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा ऑर्डर करताच त्यांना एक फोन आला. त्यावरून एका लिंकवर पाच रूपये टाकण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सलग 5 वेळा त्यांच्या अकाऊंटमधून 10 हजार याप्रमाणे 50 हजार गायब झाले. फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर या दाम्पत्यानं पोलिसात धाव घेतलीय. 

श्रीवास्तव दाम्पत्यानं निवृत्तीवेतनाचे अर्धे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यामुळे अडकून पडले आहेत. तर दुसऱ्या बँकेत त्यांनी एक लाख रूपये ठेवले होते. त्यातल्या 50 हजारांवर भामट्यांनी डल्ला मारलाय. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा...ऑनलाईन व्यवहार करताना काळजीपूर्वक व्यवहार करा.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live