VIDEO | ऑनलाईन साईटवरुन वस्तू विकत असाल तर हे पाहाच!

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

तुम्ही ऑनलाईन साईटवरून तुमची एखादी वस्तू विकताय का..मग काळजी घ्या..तुमच्या डोळ्यांदेखत तुमची लाडकी वस्तू हातोहात लांबवली जाऊ शकते..पाहूयात सविस्तर विश्लेषण...

तुम्ही ऑनलाईन साईटवरून तुमची एखादी वस्तू विकताय का..मग काळजी घ्या..तुमच्या डोळ्यांदेखत तुमची लाडकी वस्तू हातोहात लांबवली जाऊ शकते..पाहूयात सविस्तर विश्लेषण...

एका संकेतस्थळावर कणकवलीतल्या दिलीप करंजेकर यांनी त्यांची टू-व्हीलर विकण्याची जाहिरात केली होती..त्यानुसार सावंतवाडीतील एक व्यक्ती त्यांची दुचाकी खरेदी करायला आली होती.  दोघांचा व्यवहारही ठरला. मात्र, या खरेदीदारानं आपल्याकडे पुरेशी रक्कम नाही, असं म्हणत त्यानं एटीएममधून पैसे आणतो, असं सांगितलं आणि व्यवहार झालेली टू-व्हीलर घेऊन निघून गेला.
करजेकर यांनी बराच वेळ वाट पाहिली. मात्र, ही व्यक्ती काही परत न आल्यानं त्यांनी पोलिसांत तक्रार दिलीय. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलीय आणि तपास सुरू केलाय. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचंड वाढलेत .प्रामुख्यानं परस्परांवरच्या विश्वासावर ते होतात..मात्र, मोठ्या रकमेचे व्यवहार करताना आंधळा विश्वास ठेवला तर करंजीकरांची जी गत झाली, ती तुमचीही होऊ शकते.


संबंधित बातम्या

Saam TV Live