कोरोनावरील एकमेव लस अंतिम टप्प्यात, वाचा किती दिवसात लस येईल...

साम टीव्ही
रविवार, 21 जून 2020
  • कोरोनावरील एकमेव लस अंतिम टप्प्यात
  • ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या औषधानं सर्वांच्या आशा पल्लवित
  • भारतासह इतर देशांमध्येही तयार होणार लस 

आता बातमी आहे सर्वांच्या आशा पल्लवित करणारी. कोरोनावर लस कधी येणार याचीच प्रतीक्षा अनेकजण करतायेत. कोरोनावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेली एक लस आता अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या इतर औषधांच्या तुलनेत ही लस सर्वात आधी बाजी मारेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय. 

कोरोनावर लस शोधण्यासाठी सर्वच देशांमार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आघाडी घेतलीय ती ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीनं ऑक्सफर्डच्या AZD-1222 या लसीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ही लस यशस्वी व्हावी म्हणून युरोपसह अनेक देश प्रयत्न करतायेत. 

सुरूवातीच्या काळात ज्या लोकांवर या लसीची चाचणी करण्यात आली त्याचे रूग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले. आता इटलीतल्या रोममध्ये एडवेंट कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणात ही लस तयार केली जातीय. 

एका बातमीनुसार, AZD1222 ही लस मिळण्यासाठी यूरोपातील अनेक देश ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीसमोर रांग लावून आहेत.  गेल्याच्या आठवड्यात  इटली, जर्मनी, फ्रांस आणि नेदरलँडनं ऑक्सफर्डकडे 40 कोटी डोसची नोंदणी केलीय.  सरकारी मान्यतेनंतर लवकरच खुप कमी वेळात ऍस्ट्रेझेन्का या कंपनीमार्फत लसीचे लाखो डोस तयार केले जातील. याबाबत अमेरिका आणि ब्रिटननं आधीच या कंपनीसोबत करारही केलाय.  

 इटलीच्या आरोग्यमंत्र्यांनीही ऑक्सफर्डची लसच सर्वात आधी येईल असा विश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे ब्रिटन, स्वित्झर्लंड, नॉर्वे सोबत भारतात देखील ही लस तयार केली जातीय..सध्याच्या घडीला जगभरात 10 लॅबमध्ये संशोधकांमार्फत लस बनवण्याचं काम सुरू आहे. WHOच्या सांगण्यानुसार 11 लसींची चाचणी सुरू करण्यात आलीय. यात ऑक्सफर्डनं तयार केलील लस अंतिम टप्प्यात आहे. अर्थात संपूर्ण जगभरात ही लस पुरेशा प्रमाणात पोहचण्यासाठी किमान 6 महिने वाट पाहावी लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live