रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणण्यासाठी ऑपरेशन थंडर 

पुण्याहून अमोल कविटकरसह सुमित सावंत साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 18 जून 2019

ऑनलाईन तिकिट काढा किंवा तिकिट खिडकीवर जा, वेटींग हा शब्द तुम्हाला ऐकू येणारच.. पण कधी विचार केलाय, असं नेहमी का होत असेल. तर त्यामागचं कारण आता समोर आलंय. रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. तिकिट खिडकी, ऑनलाईन तिकिट सगळीचकडे दलालांचा सुळसुळाट दिसून येतो. मर्यादेपेक्षा जास्त तिकिटं दलालांकडून आरक्षित करण्यात येतात. मग तुम्हा आम्हाला पर्याय नसल्यानं एजंट्सकडे जावं लागतं आणि इथेच होते लूट. या एजंट्सकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात आणि ते निमूट द्यायला लागतात. त्यामुळंच ऑपरेशन थंडर राबवण्यात आलं. 

काय आहे ऑपरेशन थंडर ?
- रेल्वेच्या तांत्रिक आणि आयटी कक्षाच्या मदतीनं एजंट्सची माहिती काढली
-  १३ जून रोजी १४१ शहरांतल्या २७६ ठिकाणी छापा
- ६८ लाख रुपये किंमतीची तिकिटं जप्त
- ३५ जणांना अटक
- ३८७ जणांवर गुन्हे दाखल
- संशयित युझर आयडी आणि जप्त तिकिटं रद्द करण्याची प्रक्रिया सुरु
- राजस्थानमधून एएनएमएस आणि रेड मिर्ची ही संगणक प्रणाली जप्त

ऑपरेशन थंडरनंतर सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. दलालांचा हा सुळसुळाट गेली अनेक वर्ष सुरुय. यातून सामान्यांची किती लूट झालीय याचा विचारही न केलेला बरा. आता छापे मारल्यानंतर आणि दलालांना अटक केल्यानंतर तरी यापुढे तिकिटांचा काळाबाजार होणार नाही अशी अपेक्षा बाळगुया.

WebTitle : marathi news operation thunder to expose black ticketing rail tickets 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live