विधानसभेच्या तोंडावर आघाडीला मोठा धक्का..हे दिग्गज भाजपच्या वाटेवर

विधानसभेच्या तोंडावर आघाडीला मोठा धक्का..हे दिग्गज भाजपच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. आता त्याच जर भाजपमध्ये गेल्या, तर आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. 

रवि राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासाठी अमरावतीमधील जागा सोडण्यात आली होती. 

रवि राणा आणि नवनीत कौर राणा या जोडीने अमित शहा यांची भेट घेण्याला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या जोडीला भाजपच्या गोटात घेण्यासाठीच ही भेट असल्याचे मानले जात आहेत. रवि राणा म्हणाले, आम्हाला अमरावतीमध्ये विमानतळ हवे आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणेही हवे आहे. अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत या विषयावर आमची चर्चा झाली.

Web Title: Opposition may lose another ally ahead of Maharashtra Assembly elections

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com