जेडीएसबरोबर युती करण्याचा पर्याय खुला: काँग्रेस नेते गेहलोत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालात आज (ता. 15) जनमताचा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यानंतर, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी देवेगौडांच्या जनता दल पक्षाशी युती करण्याची तयारी दर्शविली आहे. 

मंगळवारी (ता.15) सकाळी अशोक गेहलोत यांनी, काँग्रेस पक्ष हा जनता दलासोबत युती करण्यास तयार आहे, याचबरोबर या निवडणूकीत काँग्रेस जिंकेल असा मला विश्वास आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपनंतर आघाडीवर असलेला काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर जनता दल तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे जनता दलासोबत युती करून काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊ शकतो. 

आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष 114 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला सध्या तरी 65 जागांवर सामाधान मानावे लागत आहे. जनता दलाला 41 जागा, तर इपक्ष 2 जागांवर आघाडीवर आहेत.   

संबंधित बातम्या

Saam TV Live