ओरियंटल बँकेत 389 कोटींचा गैरव्यवहार ; सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा एकदा नवा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. दिल्लीस्थित ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये 389 कोटींचा बँक कर्ज गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, याबाबतचा अहवाल जारी करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याबाबत बँकेने सहा महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. त्यानंतर सीबीआयने गुरुवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये 389 कोटींचा बँक कर्ज गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी यातील सर्व मालकांच्या नावांचा समावेश असून, पंजाबी बाघ परिसरात राहणाऱ्या सभ्या सेठ, रिटा सेठ, कृष्ण कुमार सिंग आणि रवी कुमार सिंग यांची नावे आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआयने करोल बाघ येथील द्वारका दास सेठ इंटरनॅशनलवर आरोप ठेवले आहेत. 'द्वारका दास सेठ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड'विरोधात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी 11,300 कोटींच्या पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live