VIDEO | भारतात समूह संसर्गाला सुरूवात, परिस्थिती गंभीर, इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा 

साम टीव्ही
रविवार, 19 जुलै 2020
  • भारतात समूह संसर्गाला सुरूवात, परिस्थिती गंभीर
  • इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा 
  • देशात दररोज 30 हजार कोरोना रूग्ण 

जगभरात थैमान घालत असलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव देशात 
दिवसा-गणिक झपाट्यानं वाढतोय. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेलीय..त्यामुळे देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली असून परिस्थिती भयावह असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिलाय.

देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीय. आतापर्यंत शहरी भागांपुरता मर्यादित असणारा करोना विषाणू आता ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय. हे धोक्याचे संकेत असून देशात आता समूह संसर्गाला सुरूवात झालीय असा इशारा आयएमएनं दिलाय. आजच्या घडीला देशात दररोज 30 हजार रूग्ण वाढतायेत. ही स्थिती अतिशय बिकट असल्यांच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.के मोंगा यांनी म्हंटलंय. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवारी सकाळपर्यंत भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाख 77 हजार 618 इतकी होती. यामध्ये 26 हजार 716 जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे, 6 लाख 77 हजार 423 जणांनी करोनावर मात केलीय. तर सद्यस्थितीत देशात 3 लाख 73 हजार 379 जणांवर उपचार सुरू आहेत.

मात्र शहरी तसच ग्रामीण भागात रूग्णांचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्यानं समूह संसर्गाला सुरूवात झालीय. ही निश्चितच चिंता वाढवणारी बाब आहे. 

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, ब्राझिलनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र भारतातली स्थिती अशीच काय राहिली तर भारत पहिल्या क्रमांकावर यायला फारसा वेळ लागणार नाही. त्यानंतर कोरोना आवर घालणं हे खडतर आव्हान असेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live