करोना लस मोहिमेला धक्का?  वाचा काय घडलंय...?

साम टीव्ही
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

 

  • कोरोना लसीच्या चाचणीला ब्रेक
  • ऑक्सफर्डने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवली
  • करोना लस मोहिमेला धक्का? 

कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. सर्वाधिक अपेक्षा असलेल्या ऑक्सफर्ड- ऍस्ट्राजेनकाच्या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी थांबवण्यात आलीय. का थांबलीय लसीची चाचणी, पाहुयात एक रिपोर्ट -

सारं जग कोरोना लसीची प्रतीक्षा करतंय. यात ऑक्सफर्डच्या लसीनं आघाडी घेतली होती. पण याच अपेक्षेवर विरजण पडलय. एका स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साइड इफेक्ट आढळून आले. त्यानंतर ही चाचणी स्थगित करण्यात आलीय. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या लशीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या व्यक्तीवर नेमका कोणत्या प्रकारे परिणाम झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. ही व्यक्ती लवकरच बरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय. अर्थात अशा चाचणीवेळी एखाद दुसऱ्या व्यक्तीवर साईड इफेक्ट होऊ शकतात त्यात चिंतेचं फारस करणं नाही असंही काही तज्ञांनी म्हंटलय.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना आपल्या लसीवर पूर्णपणे विश्वास आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हंटलंय. ऑक्सफर्डची ही लस AstraZeneca उत्पादीत करणार आहे. ही लस ChAdOx1या विषाणूपासून विकसित केली असून सर्दी निर्माण करणाऱ्या एका विषाणूचा एक भाग आहे. यात जनुकीय बदल करण्यात आला असून त्याचा मानवाच्या शरीरावर परिणाम होत नाही.
 

ऑक्सफर्ड लशीच्या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांमध्ये विषाणू विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र आता एका स्वयंसेवकांची तब्येत बिघडल्यानं चाचणी थांबवण्यात आलीय. आता त्या व्यक्तीवर लसीमुळे साईड इफेक्ट झाले आहेत का? की आणखी काय? यावरच लसीचं पुढील भवितव्य अवलंबून असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live