अखेर ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीचा परिणाम आला समोर, वाचा कोरोनावरील लसीचा कसा आहे प्रतिसाद?

साम टीव्ही
मंगळवार, 21 जुलै 2020

कोरोना लसीबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसतंय. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलंय. 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे,

कोरोना लसीबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसतंय. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची सध्या मानवी चाचणी सुरूय. शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटनं दिलीय.

ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लॅन्सेटनं म्हटलय. सध्या तरी या लसीचे कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटनं सांगितलय. 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ऍड्रियन हिल यांनी दिलीय. ही लस दोन महिन्यात उपलब्ध होईल असंही सांगण्यात येतंय. 

दरम्यान, देशात पुन्हा एकदा 35 हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या साडे अकरा लाखाच्या पार गेलीय. तर 7 लाखाहून अधिक रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत 28 हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर एक्टीव रुग्णांची संख्या 4 लाखाच्याही पुढे गेली आहे. तर राज्यात काल 8 हजार 240 कोरोना रूग्णांची नोंद झालीय. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 695 इतकी झालीय. तर राज्यात गेल्या 24 तासांत 176 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्यूदर 3.77 टक्के इतका आहे. दिवसभरात 5 हजार 460 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

यातच लस कधी येते हीच प्रतिक्षा प्रत्येकजण करताना दिसतोय. या लसीचा ुउपयोग अनेक देशांना होऊ शकतोय, त्यामुळे ही लस बाजाराता आली की कदाचित परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आपण करु शकतो.


संबंधित बातम्या

Saam TV Live