पी. चिदंबरम यांना जामिन मंजूर...

मोहिनी सोनार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पी. चिदंबरम यांना सर्वोच्च दिलासा मिळालाय. INX मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर चिदंबरम यांना जामीन सर्वोच्च न्यायालयानं मिळाला दिलाय. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आलाय. यामुळे 17 ऑक्टोबर म्हमजेच गेल्या 107 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची जेलमधून सुटका होणार आहे. चिदंबरम यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. देश सोडून न जाण्यापासून ते मुलाखत न देण्याची अट त्यांच्यावर घालण्यात आलीय. 

याआधी त्यांचा जामिन कोर्टानं फेटाळून लावला होता. मात्र आता पी. चिदंबरम यांना दिलासा मिळालाय.  सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काहीसा दिलासा देताना त्यांना अटकेपासून संरक्षण दिलंय. आता INX मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि "ईडी'ने दाखल केलेल्या खटल्यांची सुनावणी काही दिवसांनी होईल. दरम्यान, चिदंबरम यांची "सीबीआय' कोठडी मात्र कायम राहणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता, दरम्यान आता त्यांना या प्रकरणी दिलासादायक बातमी मिळालीय.

दस्तावेज घेण्यास दिला होता नकार 
काही दिवसांआनी सॉलिसीटर जनरल मेहता यांनी सीलबंद लिफाफ्यात काही कागदपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला, न्यायालयाने अंतिम आदेश देण्यापूर्वी यात लक्ष घालावे अशी मागणी केली. न्यायालयाने मात्र हेकागदपत्र स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार देत  सादर करण्याचे निर्देश दिले. हे दस्तावेज गोपनीय असल्याने अशा प्रकारे ठेवता येणार नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले होते.

आता चिदंबरम यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कधी हटेल हे सांगता येत नाही.  

Web Title -   P. Chidambaram granted bail 

संबंधित बातम्या

Saam TV Live