धान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

नवी दिल्ली : खरीप पिकांसाठी सरकारने वाढीव किमान आधारभूत दराची (एमएसपी) घोषणा केली आहे. धानाचे दर प्रति क्विंटल 65 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. भरड धान्य, कडधान्य, तेलबिया तसेच कपाशीच्याही "एमएसपी'मध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या आधारे बाजरीच्या दरात 85 टक्‍क्‍यांची तर उडीद आणि तुरीच्या दरात अनुक्रमे 64 आणि 60 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत "एमएसपी' वाढीचा निर्णय झाला. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसेच कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने आधीच केला होता. आता 2019-20 च्या खरीप हंगामासाठी "एमएसपी' वाढविण्यात आल्याचे तोमर म्हणाले. 
तेलबियांच्या "एमएसपी'मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यात सोयाबीन (311 रुपये प्रतिक्विंटल), सूर्यफूल (262 रुपये) आणि तीळ (236 रुपये) या तेलबियांचा समावेश आहे. त्याखालोखाल तूर (125 रुपये), उडीद (100 रुपये) या कडधान्यांची दरवाढ आहे.

भरड धान्यांच्या "एमएसपी'मध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हायब्रीड आणि मालदांडी ज्वारीत 120 रुपयांनी तर नाचणीच्या दरात 253 रुपयांची वाढ झाली आहे. कपाशीचेही दर मध्यम धाग्याच्या वाणासाठी 100 रुपये आणि लांब धाग्याच्या वाणासाठी 120 रुपये प्रतिक्विंटल वाढविण्यात आले आहेत. 

पिकाचा प्रकार - 2018-19मधील एमएसपी - 2019-20 सुधारित एमएसपी - वाढ (सर्व आकडे रुपयांत) 
धान (सर्वसाधारण) ः 1750- 1815 - 65 
धान (श्रेणी ए) ः 1770 - 1835 - 65 
ज्वारी (हायब्रीड) ः 2430 - 2550 - 120 
ज्वारी (मालदांडी) ः 2450 - 2570 - 120 
बाजरी - 1950 ः 2000 - 50 
नाचणी (रागी) ः 2897 - 3150 - 253 - 1700 - 1760 - 60 
तूर ः 5675 - 5800 - 125 
- 6975 - 7050 - 125 
उडीद ः 5600 - 5700 - 100 
भुईमूग ः 4890 - 5090 - 200 
सूर्यफूल ः 5388 - 5650 - 262 
सोयाबीन ः 3399 - 3710 - 311 
तीळ ः 6249 - 6485 - 236 
खुरासणी ः 5877 - 5940 - 63 
कपाशी (मध्यम धागा) ः 5150 - 5255 - 105 
कपाशी (लांब धागा) ः 5450 - 5550 - 100 

Web Title: Paddy MSP hiked by 3 and 7 Percentage

संबंधित बातम्या

Saam TV Live