शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह प्रसिद्ध उद्योजक अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. पद्मविभूषण या पुरस्कारासाठी चार नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश आहे. तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तसेच विविध क्षेत्रातील एकूण 94 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील 9 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये अभिनेते मनोज वाजपेयी, दिन्यार कॉन्ट्रॅक्टर, डॉ. सुदाम काटे, वामन केंद्रे, रविंद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, गायक शंकर महादेवन, साहित्यिक नागिनदास संघवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांच्या नावांचा समावेश आहे. 

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, संघाचे नेते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live