बेलगाम पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकच्या हल्ल्यात भारताचे 4 जवान शहीद 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडूसह जवान रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. तसंच हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चौघे जखमी झाले.  पाकिस्तानने भारतीय लष्करावर अँटी टँक गन मिसाइल, एलएमजी, मोर्टारचा मारा केला. वर्षभरात या परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 9 जवान शहीद झालेत.

पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडूसह जवान रामअवतार, सुभम सिंह, रोशनलाल हे तीन जवान शहीद झाले. वाढदिवसाच्या सहा दिवस आधीच कॅप्टन कुंडू यांना वीरमरण आले. तसंच हल्ल्यात बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चौघे जखमी झाले.  पाकिस्तानने भारतीय लष्करावर अँटी टँक गन मिसाइल, एलएमजी, मोर्टारचा मारा केला. वर्षभरात या परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 9 जवान शहीद झालेत. तर तब्बल 17 भारतीय नागरिकांनी जीव गमावले आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live