मोदींना विरोध करण्यासाठी पाकचं नवं षड्यंत्र; पाकिस्तानच्या कुरापात्या तर पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

आपलं चांगलं होत नाही, आणि दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.  काश्मीर खोऱ्यात भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकची मजल आता थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तान्यांची वाईट नजर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमावर पडलीये. 

22 सप्टेंबरला अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये एक ऐतिहासिक सभा होणार आहे. ज्या सभेचं नाव हाऊडी मोदी असं ठेवण्यात आलंय. 50 हज्जाराहून अधिक भारतीय यावेळी मोदींना ऐकण्यासाठी येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावरुन भाषण करणार आहेत. 

नेमकी हीच गोष्ट पाकिस्तानच्या डोळ्यात खुपतेय. म्हणूनच अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तान्यांनी मोदींच्या विरोधात कुरापती सुरु केल्यात. याचं केंद्र बनल्यात त्या अमेरिकेतल्या मशिदी. जिथे अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी मोदींविरोधात एकवटलेत. 

अमेरिकी-पाकिस्तान्यांनी मोदींच्या सभेविरोधात चालवलेल्या कुरापतींवर आता सर्वच स्तरांतून टीका होतेय. अमेरिकी भारतीय आणि अमेरिकी-पाकिस्तान्यांमध्ये यावरुन खटकेही उडू लागलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रतीक्षा आहे, ती मोदींच्या ह्युस्टनमधल्या भाषणाची, 22 सप्टेंबरची. जेव्हा भारतीय मिरवणार आणि पाकिस्तानची जिरवणार. 

WebTitle : marathi news pakistan continues their anti modi agenda in united states 

संबंधित बातम्या

Saam TV Live