सीमेपलीकडे पाकड्यांकडून 300 अतिरेक्यांची भरती

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर
मंगळवार, 25 जून 2019

नापाक पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीयेत, पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवर पुन्हा हालचाली सुरु झाल्यात, पाकव्याप्त काश्मिरात ISI कडून ११ नवीन लाँचिंग पॅड्सवर 300 हून अधिक दहशतवाद्यांची भरती करण्यात आलीय. दहशतवाद्यांची जमवाजमव या परिसरात जोमानं सुरु असल्याची माहिती मिळतेय.

पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मिरच्या पुँछ आणि नौशेरा सेक्टरमध्ये लाँचिंग पॅडवर सर्वाधिक अतिरेक्यांची जमवाजमव सुरु केलीय. लाँचिंग पॅडवर लष्कर ए तैयब्बा, अल बदर, जैश ए महम्मदच्या प्रशिक्षित अतिरेक्यांची जमवाजमव सुरु करण्यात आलीय. 

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर लाँचिंग पॅडवरुन बहुतेक अतिरेक्यांना पाकिस्तानी हँडलर्सकडून हटवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा याठिकाणी अतिरेक्यांच्या हालचालीला वेग आलाय. 

कोणत्या सेक्टरमध्ये किती दहशतवादी ? 

  • नौशेरा सेक्टरसमोर एलओसीच्या पास ५३ दहशतवादी जमल्याची माहिती मिळतेय. 
  • तर पूँछ सेक्टरसमोर ५१ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
  • गुरेज सेक्टरसमोरील लाँचिंग पॅडवर १४ दहशतवादी आहेत तर 
  • तंगधार सेक्टरमध्ये सीमेपलीकडे १९ दहशतवादी आहेत
  • केरन सेक्टरमध्ये सीमेपार १४ अतिरेकी आयएसआयच्या इशाऱ्याची वाट पाहतायंत
  • तर उरी सेक्टरसमोरच्या लाँचिंग पॅडवर २५ दहशतवादी आहेत
  • नौगाम आणि गुलमर्ग सेक्टरमध्ये अनुक्रमे २५ आणि ३४ दहशतलवादी जमलेत
  • रामगढमध्ये १५ तर सांबा सेक्टरमध्ये ९ दहशतवादी जमल्याची माहिती मिळतेय.

इतकेवेळा पाकिस्तानला धडा शिकवूनही पाकिस्तानची जिरली नाहीये. नव्या कुरापती काढण्यासाठी पाक सज्ज झालाय. आता कुरापती काढण्यापूर्वीच पाकिस्तानची नांगी ठेचायची आवश्यकता आहे.

Webtitle : marathi news pakistan continues their support to terrorist 300 recruited across the border

संबंधित बातम्या

Saam TV Live