काश्मिरी तरूण म्हणून शेअर केला पॉर्नस्टरचा फोटो; टिट्वरवरची टिवटिव पाकच्या माजी उच्चायुक्तांच्या अंगलट

काश्मिरी तरूण म्हणून शेअर केला पॉर्नस्टरचा फोटो; टिट्वरवरची टिवटिव पाकच्या माजी उच्चायुक्तांच्या अंगलट

काश्मिरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर भारताविरोधात बोंबा ठोकणाऱ्या पाकिस्तानचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटा पडतोय. असाच एक प्रकार पुन्हा समोर आलाय. यावेळेस भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील तरुण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केलाय. जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारं एक खोटं ट्विट व्हायरल झालं होतं. अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटलाय. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा, अशा कॅप्शनसहीत जॉनी सीनचा एका महिलेबरोबरच फोटो ट्विट करण्यात आला होता. हेच ट्विट बासित यांनी रिट्विट केलं. आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केलं असलं तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स आता व्हायरल केलेत. 

एकीकडे पाकिस्ताच्या माजी उच्चायुक्तांनी स्व:ताच्या हातनेच देशाची नाच्चकी करवून घेतलीय. तर दुसरीकडे युद्धाची खुमखुमी दाखवणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खानही चांगलेच नरमलेत. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या इम्रान खान यांनी आता मात्र युद्धाची सुरूवात आम्ही करणार नाही असं म्हंटलंय. 

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरावरही मोठा झटका बसलाय.  जम्मू काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका बसलाय आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताविरोधात पुरावे देणं कठीण आहे असं पाकच्या वकिलांनी म्हंटलंय. एकूणच सर्वच आघाड्यांवर पाकिस्तान पुरता तोंडघशी पडलाय हेच यातून स्पष्ट होतंय. 

WebTitle : marathi news pakistan fall on face on kashmir pakistani high commissioner shared post of porn star 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com