पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या - पाकिस्तान संसद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मार्च 2019

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे.

पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई केली. तसेच या भागात असणारे दहशतवादी तळ नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमानं घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. 

दरम्यान, भारतासोबत असलेला तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलल्याबद्दल इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने सादर केला.

Web Title: Give Peace Noble to Pakistan PM Imran Khan

संबंधित बातम्या

Saam TV Live