पाकिस्तानात एका शीख पोलिसाच्या घरात घुसून मारहाण 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

पाकिस्तानमध्ये एका शीख पोलिसाच्या घरात घुसून काही लोकांनी त्यांना मारहाण केली. तसेच या लोकांनी त्यांच्या डोक्यावरील पगडी काढली आणि त्यांच्या केसांना धरुन घरातून बाहेर काढले. गुलाबसिंह असे संबंधित पोलिसाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

गुलाबसिंह हे पाकिस्तानातील पहिले शीख ट्रॅफिक वॉर्डन असून, त्यांच्याबाबत हा संतापजनक प्रकार घडला. याबाबत गुलाबसिंह म्हणाले, की ''चोर, दरोडेखोर यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जाते. तशीच वागणूक मला देण्यात आली. माझ्या राहत्या घरातून मला खेचून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या लोकांनी माझ्या घराला कुलूप लावले. पाकिस्तान गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख तारासिंह आणि अतिरिक्त सचिव तारिक वझीर यांनी काही लोकांसाठी हे कृत्य केले''.  

दरम्यान, न्यायालयात माझ्यावर खटला सुरु असून, संपूर्ण गावात मला लक्ष्य करण्यात येत आहे. याशिवाय माझे घरही रिकामे करण्यास सांगण्यात आले, अशी माहिती गुलाबसिंह यांनी दिली.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live